आजच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून तंत्रस्नेही शिक्षक व्हा - राज्याध्यक्ष रवींद्र पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2019

आजच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून तंत्रस्नेही शिक्षक व्हा - राज्याध्यक्ष रवींद्र पाटील

बेळगाव येथे डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळेला शिक्षकांकडून उदंड प्रतिसाद
बेळगाव येथील दोन दिवसीय ऑडिओ व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेवेळी बोलताना रविंद्र पाटील. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. 
बेळगांव / प्रतिनिधी 
शिक्षकांचा अध्यापनशास्त्रासंबंधी अनुभव आणि तर्कशास्त्र त्यांच्या आयसीटीच्या वापरावर परिणाम करू शकते आणि शिक्षकानी नवनिर्माण शैक्षणिक साहित्य निर्मिती करुन विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम करू शकते. म्हणून आजच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून तंत्रस्नेही शिक्षक व्हा. असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अ.भा. म.सा.परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले.
बेळगाव अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्यातर्फे शिक्षक ,पत्रकार व प्राध्यापक वर्गासाठीआयोजित करण्यात आलेल्या दि. २१ व २२ डिसेंबर  दोन दिवसीय ऑडिओ व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मराठी विद्यानिकेतन मध्ये आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.म.सा. परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी.बी. पाटील यश मोटर्स चे संजय मोरे, मराठी विद्यानिकेतनचे  मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. म.सा.परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील होते. प्रारंभी परिषदचे सचिव रणजीत चौगुले यांनी प्रास्ताविक मधून मोबाईलचा उपयोग एक दर्जेदार शैक्षणिक साधन म्हणून कसा आधुनिक तंत्रज्ञान वापरून आम्ही सारे तंत्रस्नेही शिक्षक होवूया.
आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पाहुण्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थितांचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन गोपाळ चौगुले व  रणजीत चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी डी. बी. पाटील म्हणाले , आज मराठी माध्यमातील शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची शिकून ते  दृक- श्राव्य मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थांना दिल्यास खूप पारिणामकारक होवू शकतो व पटसंख्याही कमी पडणार नाही तेंव्हा शिक्षकांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. याप्रसंगी संघटनेचे मार्गदर्शक शिवसंत संजय मोरे , कार्यकर्ते संजय गौंडाडकर, मोहन पाटील , संजय साबळे , एम.के.पाटील उपस्थित होते.एनयुजेएम बेळगांव जिल्हा सचिव जितेंद्र पाटील यांचे स्वागत केले.
या कार्यशाळेमध्ये अहमदनगर येथून आलेल्या नॉलेज ब्रिजचे भूषण कुलकर्णी व एकनाथ कोरे यांनी  यु ट्युब वर आपले स्वतःचे व्हिडिओ असावेत, आपले स्वतःचे चॅनल असावे ही अनेकांची इच्छा असते.  कोणतीही महागडी यंत्रणा न वापरता, आपल्याकडे उपलब्ध असलेला स्मार्टफोन आणि काही अ‍ॅक्सेसरीज वापरून उच्च दर्जाची व्हिडिओ निर्मिती कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. या शिवाय या कार्यशाळेत दर्जेदार ध्वनिमुद्रणासाठी विविध प्रकारच्या माईकची जोडणी, आवाजाला स्पेशल इफेक्ट. फोटोग्राफी व उत्कृष्ट आवाजासह मोबाईल वर प्रोफेशनल व्हिडीओ शुटींग टेक्निक.  क्लोजअप व वाईड शूटिंग व कॅमेरा समोरील प्रभावी सादरीकरण. अनेक शूटिंग क्लिप ची विभागणी, एकत्र जोडणी  व स्पेशल इफेक्ट. पॉवर पॉईंटवर आधारित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती. क्रोमा तंत्रज्ञान व  व्हिडिओचे  युट्युब वरून प्रसारण, इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी रणजीत चौगुले व रवींद्र पाटील हे सातत्याने प्रयत्नशील होते. पहिल्या दिवशी कार्यशाळेत जवळपास शंभर अधिक शिक्षकांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन अष्टेकर यांनी केले व आभार गोपाळ चौगुले यांनी मानले.

No comments:

Post a Comment