|  | 
| मानसिंग खोराटे | 
चंदगड / प्रतिनिधी
दहा वर्ष बंद असलैला दौलत साखर कारखाना अनेक अडचणींतून मार्गक्रमण करत सद्या कारखाना सुरळीत सुरु झाला आहे . पहिल्याच वर्षी शेतकर्यानी कंपनीवर विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणावर उस पाठवत आहेत. त्यांच्या विश्वासाला बांधील राहून त्याना विभागातील ईतर कारखान्या पेक्षा जादा दर देणार आहे. या वर्षीच्या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 2600 रू शेतकर्याच्या खात्यावर जमा केलेले आहेत उर्वरित दूसरा हप्ता ही  चार-पाच दिवसात शेतकर्याच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती अध्यक्ष  मानसिंगराव खोराटे यानी दिली
ते पूढे म्हणाले   शासनाचे धोरणाप्रमाणे ऊसाचा दर निश्चित करताना मागील वर्षाचा साखर उतारा लक्षात घेवुन या हंगामात येणाऱ्या ऊसाचा दर निश्चित केला जातो . परंतु मागील दोन तिन हंगाम दौलत कारखाना बंद असलेने आपल्या कारखान्याचा एफ आर पी निश्चित करता आलेला नाही . त्यामुळे या हंगामात येणाऱ्या साखर उताऱ्याप्रमाणेच ऊस दर देणेचे कंपनीचे धोरण ठरले आहे . त्यानुसार शेमकऱ्याला पहिला हप्ता रु . 2600 / - व त्यानंतर वाढीव साखर उताऱ्याप्रमाणे देय होणारा दुसरा हप्ता लवकर जमा करत आहोत . चंदगड भागात असणारा चांगल्या जातीचा ऊस त्याचप्रमाणे येथील लाल मातीमुळे साखर ऊतारा चांगला मिळत आहे . सुरवातीला मशिनरीचे अडचणीमुळे कारखाना व्यवस्थित चालला नाही, परंतु सद्या कारखाना गाळप क्षमतेनुसार चालविला जात आहे . आणि दिवसे दिवस साखर उतारा देखील चांगला मिळत आहे . त्यामुळे ऊस उत्पादक शेमकऱ्यांना दुसरा हप्ता देखील लवकर जाहीर करणार असलेचे अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी सांगितले.दौलतवर मनापासुन प्रेम करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी , हितचिंतक यांना आवाहन आहे की , गैरसमजाला वाव न देता आपला संपुर्ण ऊस आपल्या दौलत कारखान्याकडे गाळपास पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन देखील केले आहे.
 

 
 
 
.jpg) 
 
 
No comments:
Post a Comment