धुमडेवाडी येथे सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी ठोकले सेवा संस्थेला टाळे - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2019

धुमडेवाडी येथे सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी ठोकले सेवा संस्थेला टाळे

धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे सरसकट कर्जमाफीसाठी कुलदैवत सेवा संस्थेला टाळे ठोकताना शेतकरी.

चंदगड / प्रतिनिधी
महाआघाडीच्या सरकारने केलेल  दोन लाख रूपये कर्जमाफीचा लाभ हा थकीत कर्जदारानाच होणार आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी मात्र या कर्ज माफीपासून वंचित राहणार आहेत. पोटाला चिमटा घेऊन कर्जापोटी पै-पै जमा करून गरीब शेतकरी कर्ज भरत असतो. त्यामुळे सरकार जोपर्यंत दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करत नाही. तोपर्यंत सेवा संस्थेत सचिवांना काम करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील कुलदैवत सेवा संस्थेला टाळे ठोकले. सचिव शिवाजी बाळू पाटील यांना कामकाज करण्यापासून रोखले. या कर्जमाफीबाबत सहकार निबंधकांना व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. माजी सभापती शांताराम पाटील, पोलिस पाटील मोहन पाटील, अरूण पाटील, श्रीपती पाटील, लक्ष्मण पाटील, पुंडलिक पाटील, बाळू पाटील, राजाराम पाटील, जक्कापा पाटील आदीसह बहुसंख्य  शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment