भोगोली येथे बिबट्याच्या हल्यात म्हैस गंभीर - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2019

भोगोली येथे बिबट्याच्या हल्यात म्हैस गंभीर


चंदगड / प्रतिनिधी
भोगोली (ता. चंदगड) येथील शेतकरी मारुती गावडे यांच्या म्हैशीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. काल सायंकाळी  मठ नावाच्या शेतात हि घटना घडली. मारूती गावडे हे आपली जनावरे चारवण्यासाठी मठ नावाच्या शेताकडे घेऊन गेले असता झूडपातून  बिबट्याने  झेप घेऊन म्हैसीला जखमी केले. दुभती असलेल्या या म्हैशीची बाजारभावानूसार 75 हजार रूपये किंमत आहे. बिबट्याच्या वावराने भोगोली, रायाचीवाडी, काळगोंडवाडी आणि बिजूर परिसरातील ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी म्हैशीवर उपचार सुरू आहेत.  घटनेचा पंचनामा वनरक्षक अशोक वझे, रामा मुळीक यांनी केला आहे.


No comments:

Post a Comment