सावंतवाडी येथे राज्यस्तरीय दोन दिवशीय कार्यशाळा राज्यातील पत्रकारांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2019

सावंतवाडी येथे राज्यस्तरीय दोन दिवशीय कार्यशाळा राज्यातील पत्रकारांची उपस्थिती

सावंतवाडी येथे आयोजित कार्यशाळेवेळी परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख, कीरण नाईक, दै. रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर, दै.वार्ताचे श्री. जाधव, चंदगड पत्रकार संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, संपर्क प्रमुख संतोष सुतार, संजय  पाटील उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या वतीने नुकताच सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे राज्य स्तरावरील पत्रकार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या कार्यशाळेला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पत्रकारांनी उपस्थितीती लावली होती. यावेळी सिंधुदुर्ग पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार परिषदचे  अध्यक्ष.एम.देशमुख व कीरण नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
पहिल्या दिवशी दुस-या सत्रात सर्व पत्रकारांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाला भेट दिली व सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी जवळच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बँकेत स्वागत करूनही चहा पाणासाठी निमंत्रीत केले, यावेळी  बँकेच्या भव्य ईमारतीची पत्रकारिनी पाहणी करून बँकेची प्रशंसा केली. दुसऱ्या दिवशी सर्व पत्रकारांनी गोव्याचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारने पत्रकारच्या संरक्षणासाठी जसा कायदा लागू केला आहे तसाच कायदा गोवा सरकारने लागू करावा अशी विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी येत्या  अधिवेशनात याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

No comments:

Post a Comment