![]() |
डॉ. विवेक देसाई |
कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. विवेक रविंद्र देसाई यांची नाशिक आरोग्य विद्यापीठ संघात कबड्डी खेळासाठी निवड झाली. सुरज, सिद्धार्थ देसाई बरोबर डॉ. विवेक सुद्धा कबड्डी खेळामध्ये चमक दाखवत आहे. येथील शिवाजी तरूण मंडळाचा खेळाडू असणाऱ्या डॉ. विवेकला राष्ट्रीय खेळाडू सुरज देसाई, संभाजी बामणे व पी. जे. मोहनगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विवेकच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
No comments:
Post a Comment