थेट सरपंच निवडीबाबत ग्रामविकास मंत्र्याच्या सोबत बैठकीचा शरद पवारांनी दिला सरपंचांना शब्द - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2019

थेट सरपंच निवडीबाबत ग्रामविकास मंत्र्याच्या सोबत बैठकीचा शरद पवारांनी दिला सरपंचांना शब्द


चंदगड / प्रतिनिधी 
राज्यात होणारी सरपंच निवडणूक थेट जनतेतून घेतली जाते मात्र हा निर्णय बदलून पुन्हा तो सदस्य तून घेण्याचा निर्णय सरकारने चालविला होता मात्र सरपंच परिषदेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय चुकीचा असून राज्यातील सरपंचात यामुळे खदखद निर्माण झाले आहे। असं म्हणत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नागपूर येथे देवगिरी बंगल्यावर  भेट घेतली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्यासह राज्य उपाध्यक्ष अनिल जी गीते कोअर कमिटीचे प्रमुख अविनाश आव्हाड ,राज्य सरचिटणीस विकास जाधव ,जितेंद्र भोसले, राजीव पोतनीस, माऊली वायाळ यांच्यासह  राज्यातील पन्नास वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यां च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हा निर्णय थांबवण्याची विनंती केली.
 शरद पवारांनी थेट सरपंच निवडीचा प्रश्न समजून घेऊन ग्रामविकास खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आपण ग्राम विकास मंत्र्या सोबत सरपंच परिषद मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करू असा शब्द दिला तर दुसरीकडे कॅबिनेटमध्ये या निर्णयाला मंजुरी मिळाली नाही आणि वरिष्ठ सभागृहातही हा निर्णय झाल्या नसल्याने तूर्तास तरी सरकारने पुन्हा सदस्यातून सरपंच निवडीच्या हालचाली चालवल्या होत्या त्याला ब्रेक लागला आहे. सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार, ना. छगन भुजबळ ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन थेट जनतेतुन सरपंच हा निर्णय बदलू नये यात आपण लक्ष घालावे जर त्यात काही त्रुटी असतील तर त्या जरूर दुरुस्त कराव्यात अशी मागणी केली. या शिष्टमंडळाने माजी मंत्री बबनराव लोणीकर ,माजी मंत्री सुरेश धस ,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. बाळासाहेब आजबे, आ. नारायण कुचे ,आ. कैलास पाटील ,आ.बाळासाहेब पाटील यांच्यासह राज्यातील अनेक आमदारांच्या भेटी घेऊन  थेट सरपंच निवडणुकीच्या निर्णय न बदलण्याच्या बाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती केली .या शिष्टमंडळात शिवशंकर ढवण, किशोर पाटील ,पंडित मिरगणे, प्रवीण फुंदे ,अरुण ठाणगे, आबासाहेब सोनवणे, दीपक तांबे, रवी रांजवन,संजय खोटे, हनुमान शेलार, संतोष कस्पटे, शिरीष पाटील, उद्धव गीते, राजेंद्र दगडखैर, संतोष गणवीर ,रणजीत पाटील, शंकरराव खापे, युवराज भोईटे, प्रताप चव्हाण , बोटे, राम पाटील , प्रकाश नानवटे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील पन्नासहून पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment