जक्कनहट्टी शाळेच्या अमृता ची जिल्हा स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2019

जक्कनहट्टी शाळेच्या अमृता ची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

स्पर्धेनंतर ट्रॉफी व प्रमाणपत्र स्वीकारताना अमृता पाटील, सोबत मार्गदर्शक श्रीकांत पाटील व मान्यवर.
कालकुंद्री / प्रतिनिधी
चंदगड तालुका स्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत कनिष्ठ गट मुलींच्या पन्नास मीटर धावणे विभागात जक्कनहट्टी शाळेच्या अमृता अशोक पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने शंभर मीटर धावणे, लांब उडी व उंच उडी या तिन्ही प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.   जिल्हास्तरावर निवड झालेली या शाळेची ती पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे. तिला शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील व विजय कल्लाप्पा पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment