![]() |
दुरावस्थेत तील कालकुंद्री- कागणी रस्ता जेसीबी ने उकरून पुन्हा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. |
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील प्रचंड दुरावस्थेतील कागणी- कालकुंद्री रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या प्रश्नी २७ नोव्हेंबर रोजी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, परिसरातील ग्रामपंचायती, वाहनधारक व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला होता. या वेळी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ डिसेंबर पासून रस्ता काम सुरू करू असे आश्वासन दिले होते. तथापि सात तारीख आली तरीसुद्धा रस्ता कामाकडे दुर्लक्ष झाल्याने या प्रश्नी पुन्हा तीव्र आंदोलनाचा देण्यात आला होता या जनरेट्याची दखल घेत मंगळवारी संबंधित बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.
दीड किमी लांबीचा रस्ता पावसाळ्यापूर्वीच एप्रिल महिन्यात नवीन टेक्नॉलॉजीने बनवण्यात आला होता. तथापि अतिवृष्टी व महापुरात बुडाल्यामुळे रस्ता पूर्ण खचून वाहतुकीस धोकादायक बनला होता. या रस्त्याची संपूर्ण पुनर्बांधणी करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे. सुरुवातीला मोठ्या खडीचे खडीकरण पूर्ण रस्ता कोरून पुन्हा करणे व साईड पट्ट्यांचे काम मजबुतीकरण करण्याची गरज आहे. खचलेला रस्ता व खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून कार सारखी छोटी चारचाकी वाहने बंद होती. तर हेमरस (ओलम)व दौलत कारखान्याकडे होणारी ट्रॅक्टर व ट्रक मधून ऊस वाहतूक जीवघेणी ठरत होती. यामुळे रस्त्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या. सुरू असलेले काम युद्धपातळीवर करण्याची मागणी होत आहे. वरील रस्त्यासह कालकुंद्री नजीक नवीन बांधलेल्या मोरी वरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. ते तात्काळ हाती घेऊन संबंधित ठेकेदाराने पूर्ण करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment