कोवाड / प्रतिनिधी
सद्य परिस्थितीत आपल्या जमिनीचा आणि निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. जमिनीतील अन्नद्रव्याचे संतुलन पुर्णपणे बिघडून गेले आहे. याचा परिणाम आपल्या आरोग्य होत असून आणि मातीची सुपीकता खालवत चालली आहे. त्याचे गंभीर परिणाम सामोरे येत आहेत. त्यावर मार्ग कसा काढता येईल व जमीन, पाणी, आरोग्य याचे संतुलन कसे साधता येईल. या संदर्भातील मार्गदर्शन कर्यात तसेच चंदगड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावे या उद्देशाने कोवाड (ता. चंदगड) येथील श्री साईं शेती केंद्र व महालक्ष्मी फर्टिलायझर्स एल. एल. पी. यांचे संयुक्त विद्यमाने रविवार 15 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन निट्टूर रोड कोवाड येथे केल्याची माहीती साईं शेती केंद्र चे संचालक सचिन पाटील यांनी दिली.
मेळाव्याला डॉ. निलेश मालेकर (वरिष्ठ कृषि शास्त्रज्ञ), डॉ. पांडुरंग मोहिते (कीटक शास्त्रज्ञ हुमनी - नियंत्रण ) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या भागात सद्यस्थितीत भेड़सावत असलेल्या हुमणी (रोठा) या विषयावर अभ्यास असलेले वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. ऊसशेती आणि त्याला लागणाऱ्या खतांची मात्रा याबाद्दलच्या माहिती बरोबरच माती, पाणी परीक्षण किती महत्त्वाचे आहे आणि त्या आधारे आपल्याला ठराविक पिकांना किती प्रमाणात खते देता येतील. जेणेकरुन त्याचा अपव्यय होणार नाही या संदर्भातील मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्याला हाय - ॲग्रो इंडस्ट्रीज व चंदगड तालुका खते व बी -बियाणे संघटना हे सहप्रायोजक आहेत.
No comments:
Post a Comment