![]() |
गडहिंग्लज येथे वार्षिक सर्वसधारण सभेत बोलताना ॲड. दिग्विजय कुराडे बोलताना, सोबत सुजाता केसरकर, सुनिल चौगुले, अजित राणे. |
चंदगड / प्रतिनिधी
भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास जागता ठेवला पाहिजे. हे कार्य करीत असलेल्या दुर्गवीर संस्थेचा घटक बनून मी मोठ्यातमोठी जबाबदारी पार पाडीन असे प्रतिपादन किसान सहकारी पतसंस्था ऐनापूरचे अध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी केले. दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई संस्थेच्या गडहिंग्लज येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इलेक्ट्रोटेक ऑटोमोशन कंपनीचे संचालक सुनिल चौगूले होते.
कुराडे पुढे म्हणाले, ``अशा सेवाभावी संस्थाना कार्य करीत असताना अनेक प्रशासकीय आणि इतर अडचणी येऊ शकतात. परंतु कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागात त्या सोडवण्यासाठी मी ठाम भूमिका घेईन अशी ग्वाही दिली. संस्था अध्यक्ष संतोष हासूरकर यानी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकातून दुर्ग संवर्धन मोहीमा तसेच इतर सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.`` कोल्हापूर, बेळगाव परीसरात महिपाळगड, काळानंदीगड, सामानगड तसेच वल्लभ गड येथे चालू असलेल्या संवर्धन कामाचा अनिल केसरकर, अभिजित अष्टेकर, बाबासाहेब बोरे आणि आदेश विचारे यांनी लेखाजोखा मांडला.
यावेळी सामानगड गडपाल सतिश चव्हाण, काळानंदीगड स्वयंसेवक माता पूत्र आक्काताई बामणे व विठ्ठल बामणे यांचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे गडनिहाय समन्वयक समितीचे गठन करण्यात आले. अध्यक्ष चौगूले यानी आपल्या हिरण्यकेशी फौडेशनवतीने कोल्हापूर जिल्ह्यात राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.गड संवर्धन कार्यासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्याचे अभिवचन या वेळी त्यांनी दिले.
कार्यक्रम संयोजन राज्य संपर्क प्रमूख समीर शिंदे, सिनेकलाकार अमोल देसाई, विजयराज टिपूगडे, संदीप गावडे, अवधूत यडूरकर, प्रशांत बाटे यांनी केले. याप्रसंगी, अजित राणे, वनअधिकारी डी. बी. काटकर, सुजाता केसरकर, ज्योतीताई कुराडे, सविता तोडकर, अजित पाटील, दीपक जगदाळे, सागर मुतकेकर, डॉ. श्रवण आरबोळे, पुंडलिक भांबर, सुरज हणमशेट, सचिन पाटील, महेश मिलके, बाबू जानकर, ऋषिकेश सुतार, राजू सुतार, भावनेश पिंगट, भावेश बिर्जे या सह गडहिंग्लज, आजरा, चंदगड, हुक्केरी आणि बेळगाव परीसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment