चंदगड / प्रतिनिधी
नगराध्यक्षपदासाठीचे छाननीनंतर वैध उमेदवार - वैष्णवी हळदणकर, प्राची काणेकर, स्वरा बल्लाळ, समृध्दी काणेकर, शुभांगी चौगुले, पूनम कडुकर, सुजाता सातवणेकर, मनिषा आमणगी.
नगराध्यक्षपदासाठीचे छाननीनंतर अवैध उमेदवार - पुनम विजय कडुकर, शारदा संजय काणेकर, परवीण नौशाद मुल्ला, संजीवनी संजय चंदगडकर, संध्या रामचंद्र पेडणेकर, हसनबी शहाबुद्दीन नाईकवाडी.
चंदगड नगरपंचायतीसाठी आज छाणनीच्या दिवशी नगराध्यक्षचे सोळा पैकी पाच उमेदवारांचे सहा अर्ज अवैध ठरल्याने आठ उमेदवारांचे दहा अर्ज निवडणुक रिंगणात आहेत. नगरसेवकपदासाठीचे छाणनीमध्ये 11 उमेदवारांचे 42 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे 81 उमेदवारांचे 111 अर्ज निवडणुक रिंगणात असल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी दिली.
नगराध्यक्षपदाच्या एक जागेसाठी 13 अर्ज भरले होते. तर नगरसेवकपदाच्या 17 जागासाठी 92 उमेदवारांनी 153 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी निवडणुक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी अध्यक्षतेखाली झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये नगराध्यक्षपदाचे पाच उमेदवाराचे सहा अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आठ उमेदवारांचे दहा अर्ज निवडणुक रिंगणात आहेत. तर नगरसेवक पदासाठी 11 उमेदवारांचे 42 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. 81 उमेदवारांचे 111 अर्ज वैध ठरले आहेत. ज्या उमेदवारांनी पक्षातर्फे अर्ज भरला होता. मात्र ज्यांना एबीफार्म मिळाला नसल्यामुळे काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर काही उमेदवारांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी असल्याने अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले.
नगराध्यक्षपदासाठीचे छाननीनंतर वैध उमेदवार - वैष्णवी हळदणकर, प्राची काणेकर, स्वरा बल्लाळ, समृध्दी काणेकर, शुभांगी चौगुले, पूनम कडुकर, सुजाता सातवणेकर, मनिषा आमणगी.
नगराध्यक्षपदासाठीचे छाननीनंतर अवैध उमेदवार - पुनम विजय कडुकर, शारदा संजय काणेकर, परवीण नौशाद मुल्ला, संजीवनी संजय चंदगडकर, संध्या रामचंद्र पेडणेकर, हसनबी शहाबुद्दीन नाईकवाडी.
No comments:
Post a Comment