चंदगड़ नगरपंचायतीसाठी रवळनाथ मंदिर येेथे श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2019

चंदगड़ नगरपंचायतीसाठी रवळनाथ मंदिर येेथे श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ

चंदगड नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर हात उंचावून दाखविताना. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड़ नगरपंचायत निवडणुकीसाठी  शिवसेना,राष्ट्रवादी कांग्रेस,राष्ट्रीय कांग्रेस या सर्वानी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. शुक्रवारी महाआघाडीच्या वतीने चंदगड येथील रवळनाथ मंदिर चंदगड येथे श्रीफळ ठेवून प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्वांनी महाविकास आघाडीच्या सर्व अठरा उमेदवारांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी निर्धार व्यक्त केला. आमदार राजेश पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, शिवसेना संघटक संग्रामसिंह कुपेकर,अरुण पिळणकर,दयानंद कानेकर,फिरोज मुल्ला,प्रमोद कांबळे,शिवानंद हुंबुरवाडी,राजेंद्र परीट,प्रवीण वाटंगी यांच्या सह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार व प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment