कोवाड येथील श्रीराम विद्यालयाच्या वतीने ग्रामस्वच्छता मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2019

कोवाड येथील श्रीराम विद्यालयाच्या वतीने ग्रामस्वच्छता मोहीम

 कोवाड  येथे ग्राम स्वच्छता मोहीमेत व्यस्त श्री राम विद्यालयाचे विद्यार्थी सोबत शिबीर प्रमुख आर. व्ही. व्हन्याळकर.
कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयाच्या वतीने श्रमसंस्कार उपक्रमांतर्गत ग्राम स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शाळेतील ऐंशी विद्यार्थ्यांचा एक गट असे सहा गट करून लक्ष्मीनगर चे घाट व रस्ते, मराठी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, कॉलेज रोड, दुंडगे रोड, देसाई गल्ली या विभागात स्वच्छता मोहीम राबवून रस्ते स्वच्छ केले. विद्यार्थ्यांच्या गटांना आकर्षक नावे दिली होती. श्रमसंस्कार मूल्य रुजविण्यासाठी विद्यालया मार्फत वर्षातून किमान दोन वेळा असे उपक्रम घेतले जातात अशी माहिती यावेळी शिबीर प्रमुख आर.व्ही. व्हन्याळकर यांनी दिली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी  प्राचार्य ए.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक एन. एम. मनगुतकर, जिमखाना प्रमुख एस. एस. पाटील, एस.एन.हल्याळी आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनी आघाडीवर होत्या.

No comments:

Post a Comment