![]() |
दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी. |
शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडी (काँग्रेस)चे उमेदवार प्रवीण दौलत माने हे 605 मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे प्रवीण माने यांना 8001 मते, भाजपा उमेदवार प्रमोद सुरेश पाटील यांना 7396 मते तर अपक्ष उमेदवार विजीत शिंदे सरकार यांना 7127 मते मिळाली आहेत. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अपर्णा मोरे - धुमाळ यांनी या निवडणुकीचा निकाल घोषित करून महाविकास आघाडी नवनिर्वाचित काँग्रेसचे जिल्हा परिषद नूतन सदस्य प्रवीण माने यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले , काँग्रेसचे विजयी जि प सदस्य प्रवीण माने यांंना प्रहार संघटनेचाही पाठिंबा होता.
No comments:
Post a Comment