ताम्रपर्णी नदीपात्रात मगरीचा वावर, वनविभागाचा सतर्कतेचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2019

ताम्रपर्णी नदीपात्रात मगरीचा वावर, वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

ताम्रपर्णी नदीपात्रात मगरीचा वावर असल्याने नागरीकांनी सतर्क रहावे असे आशयाचे फलक लावण्यात आले आहेत
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कर्यात भागातील ताम्रपर्णी नदीपात्रात मगरीचा वावर असलेने दुंडगे, चिंचणे व कुदनुर परिसरातील नागरीकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटणेचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी प्रसिध्दिला दिलेल्या पत्रकातून केले आहे. 
गेल्या आठवड्यात वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वन्यजीव पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. संतोष वाळवेकर व त्यांच्या पथकाने ग्रामस्थांच्यासोबत सदर परिसराची पाहणी केली. याबाबत जनजागृतीचे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मगरी विषयक माहीती व सुचना दिल्या. पाहणीवेळी वनपाल ए. डी. शिंदे, बी. आर. भांडकोळी, वनरक्षक एल. टी. मोहिते, वनकर्मचारी लहु पाटील, विश्वानाथ नार्वेकर, दुंडगेचे सरपंच राजेंद्र पाटील, चिंचणे सरपंच किरण पाटील, ग्रामसेवक प्रकाश नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment