रसायनांचा अतिवापर मानवी जीवनाला घातक – डॉ. एस. डी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2019

रसायनांचा अतिवापर मानवी जीवनाला घातक – डॉ. एस. डी. पाटील

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात आयोजित `रसायनांच्या विळख्यात आजचा समाज` या विषयावर बोलताना प्रा. डॉ. एस. डी. पाटील, शेजारी उपस्थित मान्यवर. 
चंदगड / प्रतिनिधी
विज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर व संपन्न होते. पण अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात रसायनांचा वापर वाढला आहे. कीटकनाशकांचा वापर, पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर, दैनंदिन जीवनात दूध फळे पिकवण्यासाठी व भाजीपाला पिकवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, यांचा मानवाच्या आरोग्यावर विघातक परिणाम दिसून येऊ लागला आहेत. खाद्यपदार्थात पूरक पदार्थ वापरण्यात येत आहेत. धान्यातील भेसळ वाढत चालले आहे. बदललेली जीवनशैली धोक्याच्या इशारा देत आहे. विज्ञानाचा वापर विवेकाने केला पाहिजे. आहार-विहार निद्रा यात समतोल साधायला हवा. सकस व सेंद्रिय खतावर पिकवलेले नैसर्गिक अन्नधान्य आरोग्यास पोषक ठरते असे प्रतिपादन प्रा. डॉ. एस. डी. पाटील यांनी केले. अग्रणी महाविद्यालया अंतर्गत चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यशाळेत `रसायनांच्या विळख्यात आजचा समाज` या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. आर. एन. साळुंके यांनी ``उठल्यापासून झोपेपर्यंत मनुष्य रसायनांच्या विकास सापडला आहे. विविध प्रकारच्या रंगांचा वापर हितकारक नाही, औषधांचा अनावश्यक वापर टाळला हवा, फटाक्याचा वापरण्यात येणारी रसायने घातक स्वरूपाची असतात असे सांगितले.`` प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी मुळात विज्ञान वाईट नाही. पण त्याचा वापर वाईट हेतूने होऊ नये. याची खबरदारी घेण्याची गरज आहे. अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा एस. एस. सावंत यांनी प्रास्ताविक केले. सौ. एस. बी. दिवेकर यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. एम. एम. माने यांनी आभार मानले. या कार्यशाळेला गडहिंग्लज, आजरा व चंदगड येथील महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.





No comments:

Post a Comment