![]() |
नंदकुमार ढेरे श्रीकांत पाटील |
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा चंदगड येथे झाली. यावेळी झालेल्या सभेत सन 2020-21 सालासाठी नंदकुमार ढेरे यांची अध्यक्षपदाी व श्रीकांत पाटील यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
चंदगड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संस्थापक अनिल धुपदाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत राज्य पत्रकार परिषदचे एस.एम.देशमुख यांच्या अथक प्रयत्नाने पत्रकार संरक्षण कायदा पास झाला. त्याबद्दल त्यांचा व कार्याकारणीचा अभिनंदन ठराव सर्वानुमते करण्यात आला. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने चालवला जिणाऱ्या चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलचा वर्धापनदिन तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा आणि पत्रकार दिन असा संयुक्त कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचे ठरविण्यात आले. तसेच कार्यकारिणी पुन्हा कायम करण्यात आली. बैठकीला उदयकुमार देशपांडे, संपत पाटील, संजय पाटील, संतोष सुतार,चेतन शेरेगार,संजय म.पाटील, संदिप तारीहाळकर आदी उपस्थित होते. आभार चेतन शेरेगार यांनी मानले.
No comments:
Post a Comment