हंबीरराव सयाजीराव सावंत |
कोवाड / प्रतिनिधी
महिपाळगड (ता. चंदगड) गावचे सुपुत्र हंबीरराव सयाजीराव सावंत यांनी अमेरिकेतील जॉन्सन कंट्रोल्स कंपनीत "ऑक्सिलरी हीट एक्सचेंजर फॉर एच. व्ही. ए. सी. सिस्टम'' या विषयावर पेटंट फाईल केले आहे . त्यांच्या या नव्या संशोधनामुळे वातानुकूलन उपकरणासाठी लागणाऱ्या विजेत बचत होणार आहे. अल्पावधीत सावंत यांनी कंपनीला नवे पेटंट निर्माण करुन दिल्याबद्दल ओक्लामोहा येथे कंपनीचे उपाध्यक्ष मॅांट शॉब व स्टीव्ह मॅडोक्स यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे सोशल मेडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हंबीरराव सांवत यांचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण कोवाड येथील श्रीराम विद्यालयात झाले. सन २००२ साली दहावीच्या परीक्षेत ते २५व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. नागपूर येथील एन. आय. टी. महाविद्यालयात एम. टेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीनिमित्त ते अमेरिकेला गेले आहेत. सध्या ते अमेरिकेतील जॉन्सन कंट्रोल्स कंपनीत प्रोजक्ट मॅनेज पदावर कार्यरत आहेत. सहा महिन्यापासून त्यांचे संशोधनाचे काम सुरु होते. आठ दिवसापूर्वी त्यांनी पेटंट फाईल तयार केली आहे. जॉन्सन कंपनीने त्यांची पेटंटची दखल घेऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या या यशाबद्दल वडील प्रा. सयाजीराव सावंत यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या सोशल मेडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
No comments:
Post a Comment