दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल, मलतवाडी ( ता. चंदगड) येथे सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम विदयादेवता सरस्वतीच्या फोटोचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी सध्या प्रशासकीय सेवेत असणारे कु. प्रविण मारुती सावंत लेखापरिक्षक ओझर, सावंतवाडी व कु. अमोल संभाजी पाटील लेखापरिक्षक नगरपंचायत शिंदेवाही, चंद्रपूर. तसेच प्रमुख व्याख्याते कमलेश नारायण जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन मुख्याध्यापक एस. एन. पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
अमोल व प्रविण यांच्याकडून वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन वाचनीय पुस्तके देणगी स्वरूपात शाळेला भेट दिली. या प्रसंगी अमोल पाटील यांनी आपण लेखापरिक्षक कसा झालो ते मनोगतातुन सांगितले. करिअरविषयक बोलताना कमलेश जाधव यांनी अभ्यासक्रमाची पुस्तके काळजीपूर्वक वाचा. स्पर्धच्या युगात संदर्भ वाचन महत्वाचे आहे.आपल्या परिसरातील प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अनेक अधिकारी वर्गाची ओळख करुन दिली. न्यायाधिश मा. चंद्रकांत पाटील , तहसिलदार प्रल्हाद हिरामनी, गोपाळ पाटील, एकनाथ पाटील अशा अनेक अधिकाऱ्याची ओळख करून दिली. लाथ मारीन तेथे पाणी काढीण अशी हिम्मत बाळगुण कठोर परिश्रम करा . वाचनाने माणूस समृद्ध होतो . यासाठी नेहमी वाचन करत रहा. असे मौलिक मार्गदर्शन केले. यानंतर अध्यक्षीय मनोगत मुख्याध्यापक यांचे झाले. पी.आय. पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन श्री.के. बी. कर्णिक यांनी केले.
No comments:
Post a Comment