कालकुंद्री येथे २८ रोजी तालुकास्तरीय निबंध स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2019

कालकुंद्री येथे २८ रोजी तालुकास्तरीय निबंध स्पर्धा


कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार जुनिअर कॉलेज मध्ये लोकनेते तुकाराम पवार स्मृति तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार २८ रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत संपन्न होणाऱ्या स्पर्धा तीन गटात होणार आहेत. प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी शब्दमर्यादा (दीडशे ते दोनशे शब्द) विषय मधली सुट्टी गमतीची, माझे आदर्श माझे वडील, जंक फूड नको रे बाबा, मुलगी वाचवा देश वाचवा. माध्यमिक गट इयत्ता आठवी ते दहावी (शब्दमर्यादा २५० ते ३००) विषय - स्वच्छ भारत स्वस्थ भारत, श्यामची आई संस्काराची शिदोरी, प्रलयंकारी महापूर, मोबाइल शाप की वरदान. उच्च माध्यमिक गट इयत्ता अकरावी ते बारावी (शब्दमर्यादा ३०० ते ३५०) विषय- संघर्षातून खुलते जीवन, लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार बहुआयामी व्यक्तिमत्त्व, वाचन संस्कृती आणि आजचा युवक, मोबाईल आणि आजची तरुण पिढी. असे विषय असून विजेत्यांना रोख बक्षिसे प्राथमिक गट अनुक्रमे रोख रुपये ७०१, ५०१, ३०१, १०१. माध्यमिक गट १५०१, १००१, ५०१, २०१. उच्च माध्यमिक गट २००१, १२०१, ७०१, ३०१. व सर्वांना चषक देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांना कागद पुरविला जाणार असून वेळ ४५ मिनिटे राहील. स्पर्धकांनी येताना मुख्याध्यापकांच्या सहीची ओळखपत्र घेऊन येणे बंधनकारक असून आपली नावे २७ डिसेंबर सायंकाळी पाच पर्यंत नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment