बेळगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेचे बक्षिस वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2019

बेळगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेचे बक्षिस वितरण

बेळगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेचे बक्षिस वितरण झाले. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
बेळगांव जिल्हा शिवसेना सिमाभाग याच्या वतिने किल्ला स्पर्धा बेळगांव  आयोजित करण्यात आल्या होत्या.  किल्ला स्पर्धेत सहभागी झालेले किल्ला स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला व त्याचे बक्षीस वितरण आर्यन हाॅल खडेबाजार बेळगांव येते पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर याच्या हस्ते शिवाजी महाराज च्या मुर्तिचे पुजन करण्यात आले.यावेळी उपजिल्हा प्रमुख बडु केरवाडकर याणी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर, सचिन गोरले, उपशहरप्रमुख राहुल भोसले, उपशहरप्रमुख  प्रविन तेजम, शिवा केरवाडकर, मयुरेश काकतकर, शहरप्रमुख दीलीप बैलुरकर, उपशहरप्रमुख  प्रकाश राऊत,  कुष्णा हुदरे इतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते व स्पर्धक उपस्थित होते.No comments:

Post a Comment