![]() |
हलकर्णी (ता. चंदगड ) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण दाखविण्यात शिक्षक. |
हलकर्णी (ता. चंदगड )येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या टेरेसवर सूर्यग्रहण दाखविण्यात आले.सकाळी आठ वाजून चार मिनिटाने सूर्यग्रहणाला प्रारंभ झाला. सकाळी 9 वाजून 23 मिनिटांनी त्याचा मध्य होता. सकाळी दहा वाजून 59 मिनिटाला ते समाप्त झाले दोन तास 56 मिनिटाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहणाचा आनंद लुटला.भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. राजेश घोरपडे, प्रा. ए.आर. चव्हाण व प्रा.पी एम दरेकर यांनी आयोजन केले. आकाश स्वच्छ असल्यामुळे सूर्यग्रहणाचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला यावेळी डॉ. राजेश घोरपडे यांनी सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहता येईल याची माहिती दिली.ते म्हणाले सूर्यग्रहण पाहत असताना अतिनील किरणे दृष्टिपटलावर पडून डोळे निकामी होण्याची शक्यता असते त्यासाठी सुरक्षित साधनांचा वापर केला पाहिजे. ग्रहणा बाबत अनेक अंधश्रद्धा पाळल्या जातात.ग्रहण हा पूर्णपणे नैसर्गिक अविष्कार आहे कोणत्याही गोष्टीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही .एक्स-रे फिल्म व पिन होल प्रयोगाद्वारे पडद्यावर विद्यार्थ्यांनी खंडग्रास सूर्यग्रहण याची डोळा अनुभवला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.वाय. निंबाळकर,डॉ अनिल गवळी ,श्री प्रशांत शेंडे प्रा. एस पी घोरपडे प्रा.जी. जे.गावडे ,श्री बी.बी.नाईक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment