![]() |
| बेळगाव येथे सुरक्षा रक्षकांच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसथित सुरक्षारक्षक. |
जीव धोक्यात घालून संपत्ती, सरकारी,निमसरकारी कार्यालयात सूरक्षेचे उत्कृष्ट काम करणार्या खाजगी सूरक्षा रक्षकांचा,तसेच मयत झालेल्या रक्षकांचाही सत्कार इंद्रजित प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झाला. बेळगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक रमेश गोकाक,अंमलबजावणी अधिकारी सूनिल टी.एस,जिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. प्रकाश फोंडे,प्रकाश हिरेमठ यांच्या हस्ते या सूरक्षा रक्षकाना सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र तर मयत रक्षकाच्या वारसाना रोख आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली.यावेळी पोलिस निरीक्षक रमेश गोकाक यानी खाजगी सूरक्षा रक्षकानी सूरक्षा विषयक अटी व नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देऊन रक्षकांनी आपली सेवा सतर्कता व जागरूकतेने कशी पार पाडावी याबद्दल मार्गदर्शन केले. अॅड. मनिष जाधव यानी खाजगी सूरक्षा सेवेचे बदललेले नियम याबद्दल माहिती दिली. यावेळी डाॅ प्रशांत नाईक व डाॅ जिनल नाईक यानी सूरक्षा रक्षकांच्या जिवनांत फिजीओथेरपी कशी महत्वाची आहे याबात स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन केले यावेळी श्रीकांत सूतार, सी रविंद्र ,निवृती पाटील (मलतवाडी) कृष्णा पाटील (नरेवाडी) यासह एक्स्ट्रीमचे 150 सूरक्षा रक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल तरळे,गणेश हिरोजी यानी केले तर आभार विलास जाधव यानी मानले.


No comments:
Post a Comment