ख्रिसमस मोठ्या उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2019

ख्रिसमस मोठ्या उत्साहात संपन्न


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील चर्चमध्ये चोवीस तारखेला जगामध्ये शांती लाभावी, भारत देशात ऐक्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. रात्रभर काँरल सिंगीगचा विशेष कार्यक्रम झाला, व मध्य रात्री एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या, सांताक्लॉजकडून  लहान मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या पंचवीस तारखेला दिवसभरात सुवार्ता -संदेश व प्रार्थना करण्यात आली.

No comments:

Post a Comment