जंगमहट्टी येथे ग्राहकदिन कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2019

जंगमहट्टी येथे ग्राहकदिन कार्यक्रम संपन्न

जंगमहट्टी (ता. चंदगड) येथे ग्राहक दिन कार्यक्रमावेळी मान्यवर. 
चंदगड / प्रतिनिधी
जंगमहट्टी (ता.चंदगड) येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील हायस्कूल मध्ये प्रांत ग्राहक जिल्हा समितीच्या वतीने  जागतिक ग्राहक दिन (24डिसेंबर रोजी) कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामचंद्र बेरड होते.
यावेळी उपस्थिततांचे  स्वागत अरुण पाटील यांनी केले.कार्यक्रमाची प्रास्ताविका तालुका अध्यक्ष नीलम कोदाळकर यांनी केले.ग्राहकांची बाजारात कोणत्याही प्रकारची फसवणूक होवू नये म्हणून काळजी घ्यावी, या उपक्रमाच्या माध्यमातून चळवळ वाढवावि लागेल असे सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष सागर पाटील,मनोज रावराणे,प्रांत ग्राहक समितीचे कोषाध्यक्ष राजेंद्र किरमटे ईत्यदीनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रा़ंत ग्राहक समितीचे सहसचिव शशिकांत मातोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्राहक सदैव जागृत असला पाहिजेत असे म्हटले.यावेळी बापू मटकर,यांनी मार्गदर्शन केले.यावेळी उपाध्यक्षध्य रायमन फर्नांडिस,मारूती हदगल,रामचंद्र. हदगल.ईत्यदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment