सरपंच ते मुख्यमंत्री सर्व लोकनियुक्त असावेत, सरपंच परिषदेची आण्णा हजारेंची भेट घेऊन मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2019

सरपंच ते मुख्यमंत्री सर्व लोकनियुक्त असावेत, सरपंच परिषदेची आण्णा हजारेंची भेट घेऊन मागणी

जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेवुन सरपंच परिषदेने सरपंच ते मुख्यमंत्री लोकनियुक्त असावेत अशी मागणी केली.
चंदगड / प्रतिनिधी
राज्य शासनाने लोकनियुक्त सरपंच पद रद्द केल्यामुळे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी या ठिकाणी भेट घेतली अण्णांच्या चालू असलेले मौनास  सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आणि पाठिंबा दिला तसेच राज्य शासनाने जनतेतून लोकनियुक्त सरपंच रद्द बाबत घेतलेला निर्णय राज्यातील सरपंचांना मान्य नसून याबाबत अण्णांचे  लक्ष  लक्ष वेधले राज्य शासनाच्या निर्णयाबाबत अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सरपंचपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदाची  जनतेतुन  निवड व्हावी राज्य शासनाने जनतेचा हा अधिकार हिसकावू नये खेड्यांचा विकास गटतट आणि पक्षीय  राजकारणामुळे थांबलेला आहे  राज्यातील सरपंच व जनतेने याबाबत तीव्र स्वरूपाचा विरोध करावा राज्यातील सरपंचांनी तसे ठराव करावेत व राज्यशासनाला पाठवावेत पाठवावेत प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून या असणाऱ्या शासनाच्या निर्णयाला प्रचंड विरोध करणार असे सांगितले राज्यातील जनतेने याबाबत सरपंच परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी थोरात प्रदेश सदस्य नारायण वनवे आबासाहेब सोनवणे अरुण ठाणगे स्वाती नऱ्हे व सरपंच उपस्थित होते.  सरपंच परिषद (मुंबई- महाराष्ट्र )च्या वतीने जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट  घेऊन जनतेतील सरपंच निवडी बाबत घेतलेला निर्णया बाबत लक्ष वेधले मौन व्रतात असताना अण्णांनी आपली  लेखी प्रतिक्रिया दीली असल्याची माहिती सरपंच परिषदचे  सदस्य राजु पोतनिस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment