![]() |
हलकर्णी येथील विज्ञान प्रदर्शनात विवेक इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यीनींनी विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश संपादन केले. |
जिल्हा परिषद कोल्हापूर व पचांयत समिती शिक्षण विभाग याच्या मार्फत घेण्यात आलेल्या 45 व्या तालुका स्तरीय आयोजित विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धेत विवेक इंग्लिश मेडियम स्कूल हलकर्णीच्या विद्यार्थीनीं सानिका निवृत्ती सावंत,वैभवी मारूती पाटील,अनुष्का गोपीनाथ गवस या इ. १० वीच्या विद्यार्थीनींनी तृतीय क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थीनींना विज्ञान शिक्षिका सौ. वृंदा ढेरे, पी. पी. कांबळे व मुख्याध्यापक अजय पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष आर. आय. पाटील व सचिव पी. एम. ओऊळकर व सर्व संचालक यांनी प्रेरणा दिली.
No comments:
Post a Comment