तिलारी घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2019

तिलारी घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

तिलारी घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे.
चंदगड / प्रतिनिधी
गोव्याला जाणारा सर्वात जवळचा असलेला तिलारी घाटातील रस्ता जूलै/ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन वेळा दरड कोसळून वहातूकीला बंद झाला होता.पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अथक प्रयत्न करून घाटातील रस्त्या दुरूस्ती चे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. त्यामुळे तूरळक प्रमाणात या घाटातून गोव्याला जाणारी वहातूक सूरू झाली आहे.
चंदगड तालुक्यात जूलै-ऑगस्ट महिन्यात  झालेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी गटातील रस्ता पहिल्यांदा 5जुलै ला वाहून गेला होता.यावेळी चार दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे व दगड माती बाजूला करून रस्ता वहातूकीला खूला करण्याचा प्रयत्न करत असतानाच  2ऑगस्टला या घाटातील दरड पुन्हा कोसळली.त्यामूळे या घाटातील वहातूक तब्बल चार महिने बंद ठेवण्यात आली होती.
तिलारी वीज प्रकल्पात काम करणरे बहुतांशी कर्मचारी हे तिलारीनगर येथे राहतात. या कर्मचाऱ्यांना विज प्रकल्पात नोकरीसाठी दोडामार्ग सावंतवाडी मार्गे  आंबोलीतून चंदगड व नंतर तिलारीला यावे लागले होते.तर बेळगाव व चंदगड हून गोव्याला जाणारा तिलारी हा जवळचा रस्ता असल्याने या घाटातून  मोठ्या प्रमाणात वहातूक असते. पण या घाटातील सर्वच वहातूक थांबणेत आल्याने वहातूक इसापूर-चौकूळ-आंबोलीमार्गे,चंदगड-कानूरमार्गे  बेळगाव मार्गे सूरू होती.यामुळे वहानधारक नागरिकांना चार महिने  वेळ  पैशाचा भुर्दड सहन करावा लागला. दरम्यान  काल माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यानी तिलारी घाटातील काम दुरूस्तीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पहाणी केली.यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदार याना घाटातील अवघड वळणे व रस्त्यावर आलेली धोकादायक झाडे काढण्याच्या सूचना देऊन घाटातील कामात तडजोड न करता काम दर्जेदार करण्याची विनंती केली.

तिलारी घाटातील दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या घाटातून अद्याप मोठ्या वाहनाना वाहतूकीला परवानगी दिलेली नाही. पंधरा दिवसात काम संपवण्यासाठी प्रयत्न सूरू  आहेत. त्यानंतरच घाटातून वाहातूक सूरू करणार आहे.  संजय सासणे, उपअभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग, चंदगड)

No comments:

Post a Comment