हाताला काम देणारे तंत्रज्ञान अवगत करा - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2019

हाताला काम देणारे तंत्रज्ञान अवगत करा - आमदार राजेश पाटील

हलकर्णी (ता. चंदगड) येथे विज्ञान प्रदर्शनावेळी दिडी काढताना विद्यार्थ्यी व ग्रामस्थ. 
चंदगड / प्रतिनिधी
विद्यार्थ्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करायला हवे या गोष्टीकडे चिकत्सक दृष्टिकोनातून पाहून तंत्रज्ञानाची बीजे रोरवली पाहिजे. तालुक्यात विकासाला भरपूर वाव आहे त्यासाठी विद्यार्थिदशेपासून विज्ञान तंत्रज्ञानाची ची गोडी आत्मसात व्हावी, देशाला उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी तरुण पिढीने पुढे येणे गरजेचे आहे. हाताला काम देणारे तंत्रज्ञान अवगत करा विज्ञान -तंत्रज्ञानातून तालुक्याचा विकास आपल्याला करायचा आहे. यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी हलकर्णी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती चंदिगड शिक्षण विभागाचे संयुक्त विद्यमाने आयोजित 45 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2019-20 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना उद्गार  काढले. दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते. 
या विज्ञान प्रदर्शनाला  विज्ञान दिंडीने सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. दिंडीचे उद्घाटन सरपंच एकनाथ कांबळे यांनी केले हलकर्णी फाटा ते महाविद्यालय दरम्यान विज्ञान दिंडी काढण्यात आली. यावेळी व्यासपीठावर दौलतीचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार सभापती बबनराव देसाई , जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार इत्यादी तसेच वाय.के चौधरी, प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार यांनी तर स्वागत प्राध्यापक एन एम कुचेकर यांनी केले. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले रोपट्याला पाणी घालून श्रीफळ वाढवून आमदार राजेश पाटील याने उद्घाटन केले. या वेळी त्यांचा सत्कार मार्गदर्शक गोपाळ पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व रोपटे देऊन करण्यात आला.  विविध उपकरणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गटविकास अधिकारी रमेश जोशी यांनी दालनाचे  उद्घाटन केले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, संजय पाटील उपस्थित होते.  "प्रसंगी प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती वाढते अशा विज्ञान प्रदर्शनातून भावी शास्त्रज्ञ घडतात" असे उद्गार प्राचार्य निंबाळकर यांनी काढले व्यासपीठावर चंदगड पंचायत समिती ती जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हे प्रदर्शन मंगळवार 3 डिसेंबर ते गुरुवार 5 डिसेंबर 2019 दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. मोठा सहभाग असलेल्या पहिल्या दिवशी उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.  एच.के. गावडे व प्रा. नंदकुमार पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक डी.जे भोईटे यांनी मानले.


No comments:

Post a Comment