दोडामार्ग परिसरातील हत्तींना रोखण्यासाठी बटाट बंदुकीचा वापर, हत्ती कॅम्प माध्यमातून प्रक्षिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2019

दोडामार्ग परिसरातील हत्तींना रोखण्यासाठी बटाट बंदुकीचा वापर, हत्ती कॅम्प माध्यमातून प्रक्षिक्षण

जंगली हत्तींना रोखण्यासाठी वनविभागाने आणलेल्या बटाटा बंदूकीचे वाटप शेतकऱ्यांना केले. (छाया -तुळशीदास नाईक)
दोडामार्ग / प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात तसेच चंदगड तालुका येथे धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्ती यांना रोखण्यासाठी वन विभाग यांनी अनेक प्रयत्न केले ते सर्व फोल ठरले यानंतर वन विभाग यांनी चंद्रपूर जिल्ह्यात निलगाई रोखण्यासाठी बटाटा बंदूक प्रयोग राबविला यात मोठे यश आले हा प्रयोग जंगली हत्ती यांना रोखण्यासाठी बटाटा बंदूक वापर केला जाणार आहे.दोडामार्ग वन विभाग यांच्या मार्फत हत्ती कॅम्प माध्यमातून प्रक्षिक्षण देऊन शेतकरी यांना बंदूक पुरवठा केला जात आहे.
कर्नाटक राज्य दांडेली अभयारण्य येथून मान चिगुळा फणसवाडी मांडलेली येथून तिलारी बुडीत क्षेत्रात असलेल्या पाटये शिरंगे गावात सुरुवातीला २७ हत्ती  २००२ साली  दाखल झाले. या जंगली हत्तींनी हाकलण्यासाठी  कर्नाटक शिमोगा येथून प्रशिक्षित हत्ती आणून एल्टीफंड गो बॅग टू होम मोहीम हाती घेतली पण पण प्रशिक्षित हत्ती बिथरला त्यामुळे मोहीम बारगळली.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात जंगली हत्तींचा धुमाकूळ वाढला  कोट्यावधी रुपये नुकसान केले.अनेकांचे बळी घेतले अनेकांना जायबंदी केले.जंगली हत्तींनी पहिला बळी शिंरगे गावात एका मजूर कामगाराचा घेतला.या नंतर हा जंगली हत्ती कळप गोवा बांदा सावंतवाडी माणगाव खोरे ते आंबोली चंदगड राधानगरी इथपर्यंत पोहोचले.काही हत्तींचा मृत्यू झाला.
माणगाव खोऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तींना पकडले यात दोन हत्ती दगावले, त्यामुळे धोका लक्षात घेऊन हत्ती पकड मोहीम थांबवली पण दोडामार्ग चंद्रगड तालुक्यातील अनेक गावात जंगली हत्ती वास्तव आजही आहे.
  जंगली हत्ती यांना रोखण्यासाठी मधुमक्षिका पालन  मधमाशी पेट्या बसवल्या हा प्रयोग फेल ठरला लाखो रुपये वाया गेले.मधमाशा पेटीतून एका दिवसात गायब झाल्या. त्यामुळे जंगली हत्ती रोखण्यासाठी वन विभाग यांनी केलेल्या उपयोजना फोल ठरल्या कोट्यावधी रुपये वाया गेले.
     माजी वन मंञी सुधीर मुनगंटीवार यांनी जंगली वन्य प्राणी यांना रोखण्यासाठी   प्लास्टीक फायबर पासून तयार केलेल्या हलक्या वजनाच्या शेतकरी यांना हाताळता येईल अशा बटाटा बंदूक याचा प्रयोग अमलात आणला प्रथम हा प्रयोग अनेक जिल्ह्यांत जंगली वन्य प्राणी यांच्यावर केला यात बरेच यश आले आवाजाने वन्य प्राणी पुन्हा फिरकले नाहीत.नंतर हा प्रयोग मोठ्या प्रमाणात निलगाई असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आला यात बटाटा बंदूक वापर यशस्वी झाला त्यामुळे हा बटाटा बंदूक प्रयोग दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्ती हटाव मोहिमेसाठी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.या बंदूकित बटाटा किंवा कागदाचे बोळे भरून देखील हत्ती हुसकावून लावता येतात अशी माहिती वन विभाग कोनाळ येथून देण्यात आली.

बटाटा बंदूक वापर कसा करावा
----------------------------------------
 वन विभाग यांनी हत्ती बाधीत गावातील शेतकरी यांना हत्ती कॅम्प माध्यमातून प्रक्षिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.हि बटाटा बंदूक प्लास्टिक फायबर आहे तिचे नळकांडे हे कागदाचे बोळे किंवा बटाटा जाईल एवढ्या आकाराचे आहे.या बंदूक मध्ये गॅस लाईटर आहे .त्याला स्टीगर खटका आहे.येथे नळकांडे येथे एक झाकण आहे हे झाकण काढून त्यात बाॅडी स्पे थोडा फवारुन झाकण बंद करावे या अगोदर नळकांडे मध्ये बटाटा भरुन तो ठासणीची बंदूक भरतात तसा भरावा लागतो.नतर लायटरचा स्टिगर खटका दाबला कि आग पेटून भरलेला बटाटा मोठा आवाज होऊन जंगली हत्ती यांच्या शरीरावर बसतो त्यामुळे हत्ती जंगलात धूम ठोकतात. अशा प्रकारे ही बटाटा बंदूक प्रयोग केला जाणार आहे.
--------------------------------------------
बटाटा बंदूक मुळे वन्य प्राणी किंवा जंगली हत्ती यांना कुठल्याही प्रकारची जखम किंवा इजा होत नाही हत्ती घाबरून पळून जातात. सध्या जंगली हत्ती हे चंदगड तालुका येथील वाघोञे हेरा परिसरात आहेत त्यामुळे या बटाटा बंदूक प्रयोग हत्तीवर केलेला नाही.जंगली हत्ती परत आले तर प्रयोग केला जाणार आहे शिवाय हि बटाटा बंदूक हाताळणे सोपे आहे धोका नाही.
जंगली हत्ती बाधीत विजघर घाटीवडे बांबर्डे हेवाळे,सोनावल पाळये खराडी या भागातील शेतकरी बांधव यांना जवळ जवळ तीस पेक्षा जास्त बटाटा बंदूक वितरण केले आहे शिवाय हत्ती कॅम्प माध्यमातून प्रक्षिक्षण देऊन हत्ती आल्यावर कसे परतावून लावावे हे सांगून साहित्य पुरविले जात आहे. त्यामुळे आता बटाटा बंदूक प्रयोग जंगली हत्ती रोखण्यासाठी खितपत यशस्वी होतो याकडे लक्ष लागून आहे.

No comments:

Post a Comment