नांदवडे शाळेच्या कबड्डी संघाची जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2019

नांदवडे शाळेच्या कबड्डी संघाची जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी निवड

नांदवडे (ता. चंदगड) येथील शाळेने कबड्डीमध्ये तालुकास्तरीय अजिंक्य अजिंक्यपद पटकावल्यानंतर गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार यांच्या हस्ते चषक स्विकारताना शिक्षक व विद्यार्थ्यी.
चंदगड / प्रतिनिधी
जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नांदवडे (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी क्रिडा प्रकारात मुलांच्या 14 वर्षाखालील सहावी ते आठवीच्या गटात तालुकास्तरीय अजिंक्य अजिंक्यपद पटकावले. 
चंदगड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगडणावर 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2019 अखेर या स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये कबड्डी खेळामध्ये मोठ्या मुलांच्या 14 वर्षाखालील सहावी ते आठवीच्या मुलांनी केंद्रीय प्राथमिक शाळा नांदवडेच्या शाळेने तालुकास्तरीय अजिंक्य अजिंक्यपद पटकावले. त्यामुळे कोल्हापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नांदवडे शाळेच्या कबड्डी संघाची निवड झाली आहे. याबद्दल गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार यांच्या हस्ते चषक देऊन संघाला गौरविण्यात आले. संघाला केंद्रप्रमुख एस. के. सावंत, मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी, क्रीडाशिक्षक वैजनाथ देसाई व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. 


1 comment:

Unknown said...

Congrats both of u frnds...and best of luck....

Post a Comment