![]() |
हलकर्णी ता.चंदगड येथील औद्योगिक वसाहती मध्ये असोसिएशनच्या नामफलकाचे अनावरण करताना अभियंता दिपक काकडे, प्रभावळकर ,देसाई, साखरे,आदी |
सध्या महाराष्ट्र सरकारचे धोरण हे उद्योगाभिमुख आहे . निधीची कमतरता नाही . हलकर्णी औद्योगिक क्षेत्रातील समस्यांची माहिती घेऊन पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्याला प्राधान्य देणार आहोत . येणार्या काळात सर्व फ्लॉट धारकांचे प्रश्न मार्गी लावू , शासकिय पातळीवरून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देउ असे आश्वासन एम . आय . डी . सी . चे मुख्य अभियंता दिपक काकडे यांनी दिले .
हलकर्णी औघोगिक वसाहती मध्ये असोशिएशन मार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
प्रारंभी प्रास्ताविकात पी.ए. घोंगडे यानी एम. आय . डी . सी तील समस्या मांडल्या . यावेळी असोशिएशन चे अध्यक्ष विलास देसाई यांनी एक वर्षाच्या काळात संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला . संघशक्तीमुळेच आज जवळ जवळ ३ कोटीची कामे एम - आय . डी . सी . त सुरू आहेत . यावेळी सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाचे व असोशिएशनच्या नामफलकाचे अनावरण श्री काकडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी वीरशैव को-ऑप बॅकेचे अध्यक्ष महादेव साखरे म्हणाले की लोकांनी उद्योगाला सुरवात करावी . बॅक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल जर कर्जदार वाढले तर बँकची शाखा सुद्धा आम्ही सुरू करू
बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र लकडे ,विदयुतचे अभियंता श्री प्रभावळकर .,संदीप कुंभार,अमित बुरले,यांनीही मनोगत व्यक्त केली,उपाध्यक्ष शिवाजी मोरे,सचिव प्रकाश आवडण, खजिनदार अनिल चांदेकर,सदस्य प्रकाश पाटील,विठ्ठल पाटील,शांताबाई जाधव, गावडू पाटील, प्रकाश देवाण यांच्यासह वीरशैव बँकेचे व्यवस्थापक रमेश नरगट्टी,अरुण गवळी, अरविंद डोमने, संजीव देसाई,शिवाजी सावंत,विष्णु नाईक,आर.पी. कांबळे,वसंत निट्टूरकर , रामलिग जोशी ,नरेंद्र घोंगडे उपस्थित होते.कमलेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले व विलास देसाई यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment