कोवाड परिसराला सायंकाळच्या मुसळधार पावसाने झोडपले - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2019

कोवाड परिसराला सायंकाळच्या मुसळधार पावसाने झोडपले


कोवाड / प्रतिनिधी  
कोवाड (ता. चंदगड) येथील किणी-कर्यात परिसरामध्ये भागामधे आज सायंकाळी सहा वाजता सुमारे तासभर मुसळधार पावसाने झोपडले. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. 
आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस येणार अशी चाहूल लोकांना लागली होती. सायंकाळी पावसाने सहा वाजता जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. कोवाडसह तेऊरवाड़ी, कल्याणपुर, किणी, नागरदळे, कागनी, निट्टूर, घुल्लेवाड़ी, म्हाळेवाडी, दुंडगे, कुदनुरसह राजगोळीपर्यन्त जोरदार पाऊस झाला. गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टि आणि महापुरामुळे भात शेती मोठे नुकसान झाले होते. उर्वरीत पिकांची  कशीबशी मळनी करुन साठविलेसे गवतही या पावसामुळे भिजल्याने वाया जाणार आहे. त्याबरोबरच सर्व साखर कारखाने हे सुरु झाल्याने ऊस पिकाच्या तोड़नीचे काम हे या भागात मोठ्यां प्रमाणात सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने ही अडकुन पडली आहेत. अजूनही हवेमध्ये कमालीचा गारठा जाणवत असून पावसाचे संकट काय आहे. त्यांमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

No comments:

Post a Comment