इब्राहिमपूर येथे माडखोलकर महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2019

इब्राहिमपूर येथे माडखोलकर महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय यांच्या वतीने इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे 28 डिसेंबर ते 3 जानेवारी 2019 या कालावधीत `स्वच्छ भारत – स्वस्थ भारत` या घोषवाक्याने प्रेरीत होवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीर आयोजित केल्याची माहीती प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी दिली. 
यासह शिबीरामध्ये जल साक्षरता, एड्स जनजागृती, अवयवदान जागृती अभियान, ग्राम सफाई, डिजीटल इंडिया, पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, क्रिंडागण दुरुस्ती, व्यसनमुक्ती गट चर्चा, समाज प्रबोधन, करमणुक कार्यक्रम, कुटुंब सर्वेक्षण व प्रौढ शिक्षण, आरोग्य शिबीर, अंधश्रध्दा निर्मुलन, रोकडमुक्त व्यवहार हे उपक्रम राबविले जाणार आहेत. 
शनिवारी 28 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी चार वाजता सरपंच सौ. रुपाली सावंत यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होणार आहे. ॲड. एस. आर. पाटील अध्यक्षस्थानी असतील. राष्ट्रीय सेवा योजना तरुणांचे स्फुर्तीस्थान या विषयावर प्रा. पी. सी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. 
रविवारी 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी साडेआठ वाजता माजी तंटामुक्त अध्यक्ष गणपती गिलबिले यांच्या हस्ते श्रमदानाला शुभारंभ होईल. सायंकाळी सात वाजता महिला सबलीकरण व आरोग्य या विषयावर गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णांलयाच्या समुपदेशक डॉ. सौ. पद्मजा गावडे मार्गदर्शन करतील. माजी प्राचार्या सौ. व्ही. आर. बांदिवडेकर अध्यक्षस्थानी असतील. 
सोमवार 30 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी सात वाजता योग साधना : आरोग्याचा मंत्र या विषयावर डॉ. देवकुमार सुर्यवंशी व डॉ. अनिल पाटील मार्गदर्शन करतील. सुरेश हरेर अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून ज. गा. पाटील, इंजिनियर एम. एम. तुपारे, उद्योजक के. एस. माळवे उपस्थित असतील. 
मंगळवार 31 डिसेंबर 2019 रोजी दुपारी बारा वाजता पशु चिकित्सा शिबीर होणार आहे. यामध्ये व्यवस्थापक पशुसंवर्धन विभाग गोकुळ डॉ. प्रकाश साळुंखे, पशुसंवर्धन विभाग चंदगडचे डॉ. सुधीर मिणचेकर, पशुवैद्यकीय अधिकारी चंदगडचे डॉ. ए. टी. शिवगण, पशुधन विकास अधिकारी चंदगडचे डॉ. महेश भांदुर्गे तपासणी करतील. सायंकाळी सात वाजता दै. सकाळचे पत्रकार सुनिल कोंडुसकर व दै. महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार संपत पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सेवा संस्थेचे चेअरमन शिवाजी हरेर अध्यक्षस्थानी असतील. 
बुधवार 1 जानेवारी 2019 सायंकाळी सात वाजता ॲड. एस. एल. पाटील कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी ॲड. आर. पी. बांदिवडेकर असतील. दै. तरुण भारतचे पत्रकार विजयकुमार दळवी व ॲड. एस. के. सावंत प्रमुख उपस्थित असणार आहेत. 
गुरुवार 2 जानेवारी 2019 रोजी दुपारी बारा वाजता ग्रामीण रुग्णांलय, चंदगडचे समुपदेशक विनायक देसाई व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रात्री साडेनऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून पोलिस निरिक्षक अशोक सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. 
शुक्रवारी 3 जानेवारी 2019 रोजी समारोप कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील प्रमुख पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी प्रा. आर. पी. पाटील रहातील तर दै. पुढारीचे पत्रकार नारायण गडकरी हे प्रमुख उपस्थित असतील. या शिबीराला उपस्थित रहावे असे आवाहन एन. एस. एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एन. पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment