![]() |
निकालानंतर जल्लोष करताना महाविकास आघाडीचे समर्थक. |
चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीची आज निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने नगराध्यक्षासह दहा जागा मिळवत पहिल्या निवडणुकीत सत्ता स्थापन केली. विरोधी भाजपला पाच तर परिवर्तन पॅनेलला दोन व एका अपक्षाने बाजी मारली. नगराध्यक्ष पदावर प्राची दयानंद काणेकर या 867 मतांनी विजयी झाल्या. निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी निकाल जाहीर केला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतीषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार
![]() | ||
प्राची दयानंद काणेकर
अभिजित गुरबे नेत्रदिपा कांबळे अनुसया दानी अनुसया परीट फिरोज मुल्ला
|
भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार
त्यातच या निवडणुकी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची प्रचार करताना दमछाक झाली. नगरसेवक पदाचा उमेदवारांना आपल्या प्रभागापुरते मर्यादित क्षेत्र असल्याने ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचले. त्यामुळेच त्यांना यशापर्यंत पोहचता आहे. मतदारांनी दिलेला कौल प्रस्तापित उमेदवारांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांची चंदगड शहरातून जल्लोषी मिरवणुक काढण्यात आली. संपुर्ण निकाल जाहिर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे आमदार राजेश पाटील यांनी अभिनंदन केले.
परीवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार
![]() |
मुुमताजबी मदार आनंद हळदणकर |
अपक्ष उमेदवार
![]() |
मेहताब नाईक |
हा लोकशाहीचा विजय - प्राची काणेकर
महाविकास आघाडीचा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. चंदगडच्या जनतेने टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून पारदर्शक व सर्वांना सोबत घेवून कारभार करणार आहे. शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन असे प्राची दयानंद काणेकर, (नुतन नगराध्यक्ष, महाविकास आघाडी) यांनी सांगितले.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते – नगराध्यक्ष – प्राची दयानंद काणेकर (3494), समृध्दी सुनिल काणेकर (2618), शुभांगी उदय चौगुले (84), वैष्णवी आनंद हळदणकर (161) यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या प्राची काणेकर यांनी 876 मतांनी समृध्दी काणेकर यांचा पराभव करत नगराध्यक्षपदी निवड झाली.
नगरसेवक पदाचे विजयी उमेदवारप्रभाग क्रमांक एकचे विजयी उमेदवार अभिजित शांताराम गुरबे (240, महाविकास आघाडी). पराभूत उमेदवार - प्रदिप लक्ष्मण कडते (71), अजय अशोक कदम (70).
प्रभाग क्रमांक 2 विजयी उमेदवार दिलीप महादेव चंदगडकर (88, भाजप). पराभूत उमेदवार विक्रम कलाप्पा मुतकेकर (74), जावेद लालासाहेब नाईक (46), सुधीर रामचंद्र पिळणकर (41), चेतन व्यंकटेश शेरेगार (38), राजीव दत्तात्रय चंदगकर (36), शंकर रामचंद्र देशमुख (22), जहागीर महम्मद पटेल (8), चंद्रकांत पुरुषोत्तम दाणी (7), खालिद महमद पटेल (0).
प्रभाग क्रमांक 3 विजयी उमेदवार मुमताजबी सुलेमान मदार (131, परिवर्तन पॅनेल). पराभुत उमेदवार – शहिदा शकील नेसरीकर (122), फिरदोस नियाज मदार (68).
प्रभाग क्रमांक 4 विजयी उमेदवार नुरजहा अब्दुलरहीम नाईकवाडी (158, भाजप). पराभुत उमेदवार - शगुफ्ता तजमुल फनिबंद (100).
प्रभाग क्रमांक 5 विजयी उमेदवार मेहताब आयुब नाईक (158, अपक्ष). पराभुत उमेदवार -सिकंदर मुश्ताक नाईक (150), सुहेल शहाबुद्दीन नाईक (27), सल्लाउद्दीन महमदगौस नाईकवाडी (21), इस्माईल इब्राहिम मदार (16), महमदशफी युसुफ मुल्ला (7), अब्दुलसत्तार महमदसाब नाईक (4).
प्रभाग क्रमांक 6 विजयी उमेदवार जाहीरहुसेन युसुफ नाईक (180, महाविकास आघाडी). पराभुत उमेदवार – नाविद मजिद अत्तार (144), इस्माईल महमद शहा (76), अल्ताफ महमदसाब मदार (73).
प्रभाग क्रमांक 7 विजयी उमेदवार नेत्रदिपा प्रमोद कांबळे (231, महाविकास आघाडी). पराभुत उमेदवार – विद्या विश्वानाथ कांबळे (98).
प्रभाग क्रमांक 8 विजयी उमेदवार आनंद मारुती हळदणकर (155, परिवर्तन पॅनेल). पराभुत उमेदवार – संतोष चंद्रकांत वणकुंद्रे (95), सचिन सदानंद पिळणकर (64).
प्रभाग क्रमांक 9 विजयी उमेदवार अनुसया श्रीकृष्ण दाणी (129, महाविकास आघाडी). पराभुत उमेदवार – अक्षता महेश निट्टुरकर (117), जयश्री परशराम फाटक (62), लक्ष्मी महादेव गायकवाड (21).
प्रभाग क्रमांक 10 विजयी उमेदवार अनिता संतोष परीट (172, महाविकास आघाडी). पराभुत उमेदवार – सरिता संतोष हळणदकर (171), सोनिया संजय रजपूत (51).
प्रभाग क्रमांक 11 विजयी उमेदवार सचिन निंगाप्पा नेसरीकर (140, भाजप). पराभुत उमेदवार – गजानन ज्ञानोबा पिळणकर (133).
प्रभाग क्रमांक 12 विजयी उमेदवार फिरोज अब्दुलरशीद मुल्ला (250, महाविकास आघाडी). पराभुत उमेदवार – गफार याकुब शेरखान (167), अब्दुलसत्तार आब्बास मुल्ला (77).
प्रभाग क्रमांक 13 विजयी उमेदवार माधुरी मारुती कुंभार (167, महाविकास आघाडी). पराभुत उमेदवार – सुचिता संतोष कुंभार (159).
प्रभाग क्रमांक 14 विजयी उमेदवार रोहीत राजेंद्र वाटंगी (196, महाविकास आघाडी). पराभुत उमेदवार – विनायक वसंत पाटील (132), गोविंद मनोहर गुरव (86).
प्रभाग क्रमांक 15 विजयी उमेदवार संजीवनी संजय चंदगडकर (199, महाविकास आघाडी). पराभुत उमेदवार – सुजाता सुरेश सातवणेकर (158), उज्वला विश्वनाथ सुतार (65).
प्रभाग क्रमांक 16 विजयी उमेदवार प्रमिला परशराम गावडे (266, भाजपा). पराभुत उमेदवार – संजीवनी संजय देसाई (165).
प्रभाग क्रमांक 17 विजयी उमेदवार संजना संजय कोकरेकर (178, भाजपा). पराभुत उमेदवार – माधुरी पांडुरंग पवार (100), सुवर्णा निवृत्ती गुळामकर (75).
1 comment:
Congratulations all vijayi nagarsevak..
Post a Comment