![]() |
ॲड. अनंत कांबळे सौ. मनिषा शिवनगेकर |
चंदगड पंचायत समितीच्या सभापती भाजपाचे ॲड. अनंत कांबळे तर उपसभापती पदी मनिषा शिवनगेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विनोद रणावरे होते.
प्रारंभी प्रास्ताविक आर. बी. जोशी यांनी केले. यावेळी सभापतीपदासाठी आरक्षणानुसार ॲड. अनंत कांबळे यांनी निवड झाली. तर उपसभापतीपदासाठी मनिषा शिवनगेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी माळवते सभापती बबन देसाई, उपसभापती विठाताई मुरकुटे, सदस्य जगन्नाथ हुलजी उपस्थित होते.
चंदगड पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड
यावेळी राष्ट्रवादीचे दयानंद काणेकर, नंदिनी पाटील, रुपा खांडेकर हे सदस्य गैरहजर होते. यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, गोकुळचे संचालक दिपक पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, प्रा. एन. एस. पाटील, संज्योती मळवीकर उपस्थित होते. यावेळी निवडीनंतर सभापती ॲड. कांबळे यांनी प्रलंबित कामांना प्राधान्य देवून ती पुर्णत्वास नेण्याकडे लक्ष देणार आहे. पंचायत समिती सदस्यांना विकासासाठी शासनाकडे निधीची मागणी करणार असल्याचे सांगितले. उपसभापती सौ. शिवनगेकर यांनी गट-तट न मानता सर्वांना बरोबर घेवून तालुक्याच्या विकासात भरीव योगदान देणार असल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment