इचलकरंजी येथील शरद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अकरावा वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2019

इचलकरंजी येथील शरद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अकरावा वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात


इचलकरंजी / प्रतिनिधी
शरद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अकरावा वार्षिक क्रीडामहोत्सव नुकताच पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमोल सूर्यवंशी( नॅशनल खो खो पंच) सागर पोदार (नॅशनल खो खो खेळाडू) तसेच संस्थेच्या सेक्रेटरी सौ. स्वरूपा पाटील यड्रावकर व संचालिका सौ पदमश्री खंजिरे, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक शेट्टी, सौ आरती जोशी, मंगेश आगलावे, उपस्थित होते कार्यक्रमाचे सादरीकरण प्रशालेचे विद्यार्थी मंथन निकम, सानिया मोमीन, रमेश ढोली, राज खवरे यांनी केली. प्रमुख पाहुणे यांनी खेळ हा अतिशय महत्वाचा घटक आहे, आपल्या आयुष्यात असे सांगितले. या नंतर अशोक शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. आभार प्रदर्शन सौ. स्नेहा वरुटे यांनी केले. या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यध्यापक अशोक शेट्टी व मंगेश आगलावे यांचे लाभले.


No comments:

Post a Comment