![]() |
मिरज संस्थेच्या वतीने मानव कल्याण गौरव पुरस्काराने क्रिडा शिक्षक शिवाजी पाटिल यांना
सन्मानीत करण्यात आले.
|
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
आदर्श विद्यानिकेतन मिणचे येथील क्रिडा शिक्षक शिवाजी पाटिल यांना मास फॉर सिटीजन (मानव अधिकार संस्था) मिरज या संस्थेच्या वतीने मानव कल्याण गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
मास फॉर सिटीजन यांच्या मार्फत दरवर्षी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केलेल्या व्यक्तीचां गौरव केला जातो. क्रिडा व सामाजिक क्षेत्रातील चांगल्या कामाबद्दल श्री. पाटील यांचा कवठेमहांकाळ येथे राज्यस्तरीय मानव कल्याण पुरस्काराने सन्माणित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. श्री. पाटील हे चंदगड तालुक्यातील दौलत मराठी विद्यामंदिर, हलकर्णी हायस्कुल तसेच गुरुवर्य गुरुनाथ पाटील कनिष्ठ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होय. श्री. पाटील यांना पुरस्काराने सन्मानीत झाल्याचे समजताच त्यांच्या मित्रांनी त्याच्या आठवणीना उजाळा दिला.
No comments:
Post a Comment