![]() |
चंदगड बसस्थानकातील स्वच्छतागृहाची सद्यस्थिती |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहात घाण पाणी तुंबल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारासह आगार प्रमुखाचे या दुर्गंधीकडे दुर्लक्ष झाले आहे . प्रवाशांच्या सोयीसाठी येथे मोफत स्वच्छतागृह उभारलेले आहे. खास प्रवाशांसाठी उभारलेल्या मोफत स्वच्छतागृहाचा वापर करणारे लोक जास्त आहेत. परंतु स्वच्छतागृहातून बाहेर जाणारे घाण पाणी गटर तुंबल्याने परिसरात घाण सुटली आहे. विशेष म्हणजे हे स्वच्छतागृह येथील न्यायालयाच्या मागील बाजूसच आहे. या बस स्थानकावर दररोज हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी, कोर्ट, तहसिल व पोलिस ठाण्यात कामानिमित्त नागरिकांची ये-जा असते. या सर्वांना या दुर्गंधीचा वास सहन करावा लागत आहे. आगारप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन स्वच्छतागृह वापरायोग्य बनवावी अशी मागणी होत आहे. याबाबची निविदा काढली जाते. मात्र या निविदेमध्ये स्थानिक स्वयंमरोजगार संस्थांना अशी कामे करण्याचा ठेका देण्यासाठी प्रथम प्राधान्य दिल्यास स्वच्छतेचे कायमचा प्रश्न सुटेल.
No comments:
Post a Comment