उमगाव येथील शिवाजी गावडेच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांचे वकीलपत्र घेऊ नये – ग्रामस्थांचे प्रसिध्दी पत्रक - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2020

उमगाव येथील शिवाजी गावडेच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांचे वकीलपत्र घेऊ नये – ग्रामस्थांचे प्रसिध्दी पत्रक


चंदगड / प्रतिनिधी
विनयभंगाची खोटी फिर्याद केल्याने मानहानी झाली. या कारणाने उमगाव (ता. चंदगड) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गावडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या संशयित नऊ जणांचे वकीलपत्र कोणत्याही वकीलांनी घेऊ नये. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक उमगाव येथील ग्रामस्थांनी प्रसिद्धीला दिले आहे.
प्रसिद्धीला पत्रकात म्हटले आहे की, ``उमगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गावडे यांच्यावर चंदगड पोलिसांत विनयभंगाची फिर्याद एका महीलेने केली होती. त्यामुळे आपली नाहक मानहानी झाली म्हणून शिवाजी गावडे यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्यांवर बेळगाव येथील सिव्हिल हाँस्पीटल येथे उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी तपासकामी दिरंगाई केल्याने एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे. संशयित आरोपींना सोडवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. खासकरून वकील संघटनेला आम्ही ग्रामस्थ विनंती करत आहोत की, या प्रकरणातील कोणाचेही वकीलपत्र कोणत्याही वकीलांनी घेऊ नये, घेतल्यास संमधीत वकीलांच्या घरासमोर मोर्चा काढला जाईल. होणाऱ्या परिणामाला तेच जबाबदार असतील असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर संभाजी गावडे, रमेश किरमटे, धानू गावडे, दिपक गावडे, नारायण गावडे, संतोष पाटील, मनोहर कांबळे, संतोष हसबे, नितीन फाटक, प्रविण कांबळे या ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 


No comments:

Post a Comment