हलकर्णी व कार्वे येथे शिक्षकांचे 'निष्ठा' प्रशिक्षण उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2020

हलकर्णी व कार्वे येथे शिक्षकांचे 'निष्ठा' प्रशिक्षण उत्साहात

प्रशिक्षण मधील उपक्रमात सहभागी झालेले शिक्षक.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी यांचे 'निष्ठा' अर्थात मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी राष्ट्रीय पुढाकार  प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. 30 डिसेंबर ते 31 जानेवारी अखेर प्रत्येकी पाच-पाच दिवसांच्या पाच टप्प्यात प्रशिक्षण घेण्यात आले. तालुक्यातील 726 शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती  ए. एस. कांबळे यांच्या हस्ते सौ. एस एस सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 
तज्ञ मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख वाय. के. चौधरी, डी. डी. पाटील,डी. टी. कांबळे, प्रकाश पाटील, प्रशांत मगदूम, संतोष शरबिद्रे आदींनी  शालेय नेतृत्व संकल्पना उपयोजन, शाळा पूर्व शिक्षण, शाळेतील पूर्व व्यावसायिक शिक्षण, अध्ययन अध्यापनात दृष्टिकोनाची उपयुक्तता, निकोप शालेय वातावरण, वैज्ञानिक दृष्टिकोण याबाबत पाच दिवस मार्गदर्शन केले. प्रशिक्षण काळात विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकांत वै. पाटील (कोवाड), गोविंद पाटील (कौलगे), गोविंद चांदेकर(तडशिनहाळ), रंजीता देसुरकर (वरगाव), सौ. सुमन सुभेदार (गशिअ चंदगड) आदिंना सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षण काळात डाएट कोल्हापूर चे प्राचार्य आय. सी. शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी टोणपे आदी विविध मान्यवरांनी भेट देऊन प्रशिक्षणाच्या सर्व टप्प्यांबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपसभापती मनीषा शिवणगेकर, आप्पाराव पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट साधन केंद्र चंदगड चे विषय तज्ञ सुनील पाटील, एम. ए. नाईक, बी. ए. देसाई हंबीरराव कदम, तानाजी पाटील, स्वाती चौगुले आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment