हलकर्णी फाटा ता चंदगड येथील चंदगडी नाट्य महोत्सव उद्धाटन प्रसंगी बोलताना अभिनेते अनिल गवस,बसलेले आमदार राजेश पाटील, माजी सभापती शांताराम पाटील,द य कांबळे, अविनाश पाटील
चंदगड / प्रतिनिधी
नाटक हे मराठी नाट्य रसिकांचा श्वास आहे . नाटक बघताना माणूस स्वत : ला हरवून जातो . नाटक जगण्याला बळ देते . तसेच दैनंदिन जीवनातील समस्या सोडवायला देखील मदत करते . माणूस म्हणून आपण सर्वांनी एकमेकाशी माणुसकीच्या नात्याने वागूया आणि जीवनातील आनंद उपभोगुया असे प्रतिपादन नाट्यकर्मी छत्रपती संभाजी मालिकेतील प्रसिद्ध हंबिरराव मोहिते फेम अनिल गवस यांनी केले . हलकर्णी फाटा ( ता . चंदगड ) येथे साई नाट्यधारा संस्थेच्या वतीने आयोजित नाट्यमहोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटप्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते . नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले.
कुडाळ येथील साई कलामंचच्या कलाकारांनी सादर केलेला ' तुझ्यात जीव रंगला ' या नाटकाने महोत्सवाची सुरवात झाली . सचिव परसू गावडे यांनी चंदगड तालुक्यात नाट्य चळवळ रूजवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे प्रास्ताविकात सांगितले . गवस पुढे म्हणाले , " रंगभूमीवरील तुमचे काम अपरिहार्य आणि अस्सल असावे . नेमके हेच बऱ्याच जणांना जमत नाही . आपण करत असलेली भूमिका सर्वस्पर्शीय , अद्वितीय आणि मननीय असावी . ज्यांना अभिनेता व्हायचे आहे , त्यांना या गोष्टींचे भान असणे गरजेचे आहे . माणसाच्या जीवनात गुंतागुंत आहे , ही गुंतागुंत असणाऱ्या माणसाच्या हृदयाची स्पंदण ज्या रंगकर्मीला समजतात तोच रंगकर्मी अभिनयाचा अस्सलतेचा नमूना उभा करतो . " .
तुझ्यात जीव रंगला नाटकातील एक क्षण.
आम . राजेश पाटील म्हणाले , जनतेने आपल्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिले असल्याने त्या विश्वासास पात्र राहून विकासाला चालना देणार आहे . तालुक्यात सर्वसोयीनीयुक्त असे नाट्यगृह उभा करण्याचा मानस असून नाट्यकला बालवयातच रूजवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले . या वेळी तालुक्यातील जेष्ठ रंगकर्मी द . य . कांबळे यांचा सत्कार अभिनेते अनिल गवस यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला . या वेळी माजी सभापती शांताराम पाटील , वसंत निट्टरकर , मनोहर चांदेकर , आर . आय . पाटील , विष्णू गावडे उपस्थित होते . सूतसंचालन सुभाष बेळगावकर यानी केले तर आभार धनाजी पाटील यांनी मानले.
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची माहिती संकलन कार्यशाळा केंद्रीय प्राथमिक शाळा कोवा...
Comments
महत्वाची टीप
या इंटरनेट युट्युब न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो चंदगड न्यायालयअंतर्गत मान्य राहील.
No comments:
Post a Comment