मलाप्पा भैरु किणेकर |
चंदगड तालुक्यातील तुडये ते म्हांळुगे रोडवर मळवी क्रॉसजवळ ट्रक्टर व दुचाकी यांची समोरसमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मल्लाप्पा भैरु किणेकर (वय-26, रा. मळवी, ता. चंदगड) असे मयताचे नाव आहे. आज सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला. रमेश मंगेश पाटील यांनी याबाबतची फिर्याद चंदगड पोलीसात दिली आहे.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी - तुडये ते म्हांळुगे रोडवरुन दुचाकीस्वार मल्लाप्पा भैरु किणेकर हे आपल्या मोटरसायकलने (एम. एच. 09, डी. के. 2940) म्हांळुगेकडून तुडयेला जात होते. याचवेळी तुडयेकडून म्हांळुगेकडे ट्रक्टरचालक रवळु कृष्णा बडसकर हे आपले ट्रॅक्टर (एम. एच. 09, जी. जे. 7314) घेवून जात होते. यावेळी ट्रक्टर व दुचाकीस्वार यांची समोरसमोर जोराची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार मल्लाप्पा किणेकर यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच मयत झाले. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. कॅ. श्री. नांगरे तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment