उमगाव तंटामुक्त अध्यक्ष आत्महत्या प्रकरणी सहा संशयितांना ३१ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2020

उमगाव तंटामुक्त अध्यक्ष आत्महत्या प्रकरणी सहा संशयितांना ३१ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी


चंदगड / प्रतिनिधी
उमगाव (ता. चंदगड) येथील तंटामूक्त अध्यक्ष शिवाजी विष्णू गावडे ( वय -47) यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटक केलेल्या गोविंद निंगु गावडे,ज्ञानेश्वर गोविंद गावडे,राजाराम गोविंद गावडे,विरेंद्र विठ्ठल गावडे,शोभा विठ्ठल गावडे,संगीता राजाराम गावडे (सर्व रा. उमगाव) या सहा संशयित आरोपींना आज चंदगड येथील न्यायालयात हजर केले असता  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. गायकवाड यांनी ३१जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
माराहण करून विनयभंगाची खोटी तक्रार पोलीसात दाखल झाल्याने आपली बदनामी झाली. या कारणामुळे उमगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी विष्णू पाटील यानी 24 जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा बेळगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी मयताची पत्नी सावित्री शिवाजी गावडे यांनी चंदगड पोलिसांत फिर्याद दिली. गोविंद निंगु गावडे, ज्ञानेश्वर गोविंद गावडे, राजाराम गोविंद गावडे, विरेंद्र विठ्ठल गावडे, शोभा विठ्ठल गावडे, संगीता राजाराम गावडे (सर्व रा. उमगाव) यांच्यासह या प्रकरणात जि. प. सदस्य सचिन बल्लाळ व माजी सरपंच सटूप्पा पेडणेकर व पोलिस कर्मचारी मानसिंग चव्हाण यांनी आरोपीना सहकार्य केल्याच्या संशयावरून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान गोविंद निंगु गावडे,ज्ञानेश्वर गोविंद गावडे,राजाराम गोविंद गावडे,विरेंद्र विठ्ठल गावडे,शोभा विठ्ठल गावडे,संगीता राजाराम गावडे,(सर्व राहणार उमगाव) या सह आरोपींना कालच अटक करण्यात आली आहे. तर सचिन बल्लाळ, सटूप्पा पेडणेकर व मानसिंग चव्हाण (चंदगड पोलीस ठाणे) हे तीन संशयीत आरोपी फरारी आहेत. 
घटनेमुळे चंदगड पोलीस ठाण्यासमोर दिवसभर लोकांनी गर्दी केली होती. 

या प्रकरणीतील सचिन बल्लाळ, सटूप्पा पेडणेकर, मानसिंग चव्हाण हे तीन संशयित आरोपी फरारी आहेत. त्यांना पकडण्यासाठी सापळा रचना आहे. मोबाईल लोकेशन तपासून त्यांचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी आरोपीना पकडून या प्रकरणात दोषी असलेल्यावर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक सातपुते यांनी सांगितले. 

   

No comments:

Post a Comment