तेऊरवाडी / प्रतिनिधी
कापड व्यवसायात अल्पावधीतच नावलौकीक मिळवलेल्या कोवाड (ता. चंदगड ) येथील रूपसंगम फॅशन पार्क व रुपसंगम स्वस्तम साडी डेपो कडून ग्राहकासाठी एक खास सवलत योजना ठेवण्यात आली आहे . सध्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात गाजत असलेल्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी रूप संगम फॅशन पार्कचे सर्वेसर्वा दयानंद सलाम यांनी ग्राहकांसाठी खास सवलत योजना जाहिर केली आहे. या चित्रपटाचे तिकिट दाखविल्यास ग्राहकाना फॅशन पार्कमधील जेन्टस् वेअर, लेडीज् वेअर, चिल्ड्रन्स वेअर व साडी खरेदीवर भरघोस अशी ३o टक्के सवलत देण्यात येत आहे. या विभागात सर्वात मोठे कापडांचे दालन येथे आहे. साडया व रेडीमेड कापडांच्या हजारो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर व अतिशय उत्तमरित्या सेवा देणारे रूपसंगम फॅशन पार्क व रुप संगम स्वस्तम साडी डेपो सदैव उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामूळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील ग्राहकही येथे भेट देवून खरेदी करत आहेत. ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करून व तानाजी चित्रपटही जास्तीत जास्त लोकानी पहावा या उद्देशाने ही सवलत योजना जाहिर केली असल्याचे दयानंद सलाम यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.
No comments:
Post a Comment