म्हाळेवाडी येथे सामान्यज्ञान स्पर्धेत नऊशे स्पर्धकांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2020

म्हाळेवाडी येथे सामान्यज्ञान स्पर्धेत नऊशे स्पर्धकांचा सहभाग

म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे सामान्यज्ञान स्पर्धेच्या फलकाचे अनावरण करताना शिवराज महाविद्यालयाचे संस्थापक किसनराव कुऱ्हाडे, शेजारी आमदार पाटील व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
म्हाळेवाडी( ता. चंदगड) येथील सौरभ पाटील युवा फौडेशन आयोजित सामान्यस्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्या. या स्पर्धेला 900 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शिवराज महाविद्यालय (गडहिंग्लज)चे संस्थापक किसनराव कुऱ्हाडे होते.
स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक ओमंकार जाधव, समर्थ नाईक, दिव्तीय शंतून बेनके,  तृतीय वैभव गुरव, निखील मोरे, समर्थ कुंभार, चतुर्थ पियुष पाटील, श्रेया देसाई, सुनैन फडके पाचवा क्रमांक तेजस बेरडे. 5 वी ते 7 वी च्या गटात अनुक्रमे दिपाली पाटील, शैलेश धुडूम, शर्विल घोळसे, सदिच्छा जाधव, प्रतिक पाटील, संकेत गुरव तर पाचवा क्रमांक प्राजक्ता कुरळे हिने पटकावला. पहिली ते चौथी या गटात स्वांनद बागडी, साईश्री देसाई, सलोनी मोहते, अपूर्वा भोगुलकर, शुंभागी पाटील, निकीता मोरे, शरण्या पाटील, सायली ठाकरे,ऋग्वेद जाधव यांनी क्रमांक पटकविले. संचालक शिवाजी शंकर पाटील, दुर्गविर प्रतिष्ठान गडकिल्ले प्रदर्शनचे उद्घाटन संतोष हसुरकर यांनी केले. संभाजी पाटील  यांनी सुत्रसंचालन केले. सुरज पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment