चंदगड / प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा सुरु केली. पुणे येथील भीडेवाडा हे सर्व महिलांंचे तीर्थक्षेत्र आहे. या स्थळाला भेट देवून त्याचे महत्व समजून घेणे जरूरीचे आहे असे प्रतिपादन शेवाळे (ता.चंदगड)येथील हलकर्णी महाविद्यालयात'महिला सबलीकरण'विभागामार्फत आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी आयुष्य वेचले.तळागाळातील समाजाला शिक्षणाचे दार या दापंत्यानी केले. असे मळवीकर बोलाताना म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. पी.वाय निंबाळकर होते. प्रास्ताविक प्रा.गीता पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.काझी यांनी तर आभार प्रा.पूजा गावडे यांनी मानले. प्रा.एस.डी.पाटील, प्रा.ऊतुरे,सौ.माधुरी पाटील, यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment