![]() |
आजरा येथील तालुका सरपंच परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या प्रसंगी मान्यवर. |
आजरा / प्रतिनिधी
आजरा तालुका सरपंच परिषदेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकताच तालुका अध्यक्ष संभाजी सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली गंगामाई वाचन मंदीरात पार पडली. प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच परिषदेच्या महिला राज्याध्यक्षा राणीताई पाटील होत्या.
प्रारंभी राणीताई पाटील यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महिला तालुकाध्यक्षा वृषाली कोंडुसकर यांनी केले. यावेळी नुतन आजरा पं. स. सभापती उदयराज पोवार, उपसभापती वर्षाताई बागडी,स्मार्टग्राममध्ये आजरा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मेंढोलीचे सरपंच अँँड. लक्ष्मण गुडुळकर, आजरा तालुका सरपंच परिषदेच्या महिलाध्यक्षापदी निवड झालेबद्दल सौ. वृषाली कोंडुसकर, सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेबद्दल राजाराम पोतनीस, स्मार्टग्राममध्ये पुणे विभागात ३रा क्रमांक मिळविल्याबद्दल श्रृंगारवाडीच्या सरपंच सौ. आंबुताई सुतार आदी मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला.प्रास्ताविक सचिव संतोष बेलवाडे यांनी केले. सरपंच परिषदेचा वार्षिक आढावा अध्यक्ष संभाजीराव सरदेसाई यांनी घेतला. दरम्यान सर्वानुमते नविन तालुका कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार सरपंच परिषदेचे मार्गदर्शक मोरे सर यांना देण्यात आले. मनोगत राजाराम पोतनीस, मारुती मोरे यांनी व्यक्त केले. सौ.राणीताई पाटील यांनी सरपंच परिषदेच्या सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले व ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सबलीकरणासाठी विस्तृत माहिती सांगितली. सभेला आजरा तालुक्यातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. यावेळी महीला सदस्यांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम पार पडला. आभार वृषाली कोंडुसकर यांनी मानले. सभेनंतर शासनाने रद्द केलेल्या लोकनियुक्त सरपंच निर्णया विरोधात तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment