युवकांनी स्वप्नपूर्तीसाठी अविरत प्रयत्न करावेत - प्रा. डॉ. जालंधर पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2020

युवकांनी स्वप्नपूर्तीसाठी अविरत प्रयत्न करावेत - प्रा. डॉ. जालंधर पाटील

 र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील `युवकांसमोरील आव्हाने` या कार्यक्रमात बोलताना  प्रा. डॉ. जालंधर पाटील व शेजारी इतर.
चंदगड / प्रतिनिधी
तरूणांनी नेहमीच मोठी स्वप्ने पाहावीत. स्वप्नपुर्तीसाठी अवरित प्रयत्न करावेत. ध्येय उत्तुंग असेल तर परिश्रमाचाही अनोखा आनंद मिळतो. प्रत्यक्ष जीवन व समाज यांच्यामधील प्रचंड सकारात्मक उर्जेचा स्त्रोत मिळवता आला पाहिजे. समाजातील प्रतिष्ठेचे खोटे मुखवटे ओळखायला शिकले पाहिजे. " असे प्रतिपादन प्रा. डॉ. जालंधर पाटील यांनी केले. ते येथीर र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील `युवकांसमोरील आव्हाने` या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 
श्री. पाटील पुढे म्हणाले "जीवन हे समरांगण आहे. संघर्ष हा त्याचा स्थायीभाव आहे. समर्पि वृत्तीने जगून दुसऱ्यांनाही आनंद वाटता आला पाहिजे. दडपण व दबाव झुगारून आनंदी उल्हासित वृत्तीने जीवनाला सामोरे जावे. मनात आणले तर तरूणाई आकाशाला गवसणी घार शकते. स्वत: च्या पंखातील अस्मानभरारीचे सामर्थ्य शोधण्यासाठी आत्मपरीक्षण करायला हवे. "तरूणांनी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी महापुरूषांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्यार्थीवृत्ती जोपासण्याची गरज आहे. आजच्या सांस्कृतिक संक्रमणाच्या काळात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची गंगा खेडोपाडी व स्त्रियानांही पोचविण्यासाठी केलेल्या कार्याचे विस्मरण होताना दिसते. छत्रपती शिवरायांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती स्वराज्याची स्थापना करण्याचे जे जागतिक इतिहासात गौरवाने नोंदवावे लागेल असे अद्भुत काम केले. हिरोजी इंदुलकरासारख्या शिवरायांचा स्वामीनिष्ठ मावळा केवळ पायरीचा दगड बनणे पसंत करतो. त्याला सत्ता,  संपत्ती, प्रसिद्धी यांचा सुतराम मोह नाही. आपल्या देशाचा हा गौरवशाली वारसा आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. मोबाईल, सोशल मिडिया, चंगळवादी संस्कृती आपल्या देशाला पुन्हा एकदा विनाशाच्या खाईत लोटू पाहात आहे. आपण वेळीच सावध होऊन स्वत:ला सावरले नाही तर पुन्हा एकदा अराजकाची स्थिती निर्माण होईल याचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी संघटित युवाशक्ती विधायक कार्याचा आदर्श प्रस्थापिर करू शकते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला राजेंद्र गडयाण्णावर, जनार्दन पाटील, अजित पवार, प्रा. व्ही. के. गावडे, प्रा. एस. के. सावंत, प्रा. एस. एन. पाटील, डॉ. पी. एल. भादवणकर, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रा. डॉ. ए. वाय. जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. एस. डी. गोरल यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment